Ticker

6/recent/ticker-posts

खटाव तालुक्यातील तहसील कार्यालयातील वाटर एटीएम मशीन गेल्या अनेक महिन्यापासून बंद अवस्थेत आहे प्रशासनाचे दुर्लक्ष.



दैनिक लोक युवा/जिल्हा प्रतिनिधी नितीन राठोड 

खटाव तालुका तहसील कार्यालयातील पिण्याच्या पाण्याची वॉटर मशीन गेल्या अनेक महिन्यापासून बंद अवस्थेत आहे वारंवार तक्रार करूनही प्रशासन दुर्लक्ष करत आहे. 

कार्यालयात कामानिमित्त परिसरातून लांबून महिला पुरुष येत पिण्याच्या पाण्यासाठी गैरसोयीचा सामना करावा लागत आहे तसेच शासकीय कर्मचारी व स्वच्छतागृह घाणीच साम्राज्य कर्मचारी स्वच्छता करत नाही वेळोवेळी सांगूनही वेळ काढू पणा करत आहे सदर पिण्याचे वॉटर मशीन प्रत्येक कार्यालयात असणे बंधनकारक आहे व कार्यालयात कामासाठी येणाऱ्या प्रत्येकाला स्वच्छ व मुबलक पाणी मिळावे हे शासनाचे धोरण आहे तरीही प्रशिक्षण त्या गोष्टीकडे गांभीर्याने विचार करत नाही. पिण्याच्या पाण्याचे वॉटर मशीन अस्वच्छ परिसरात ठेवली आहे तेथील स्वच्छता होत नाही तहसीलदार यांना वेळोवेळी निवेदन देऊन दखल घेतली जात नाही तात्काळ प्रशासनाने दुरुस्ती व स्वच्छता हाती घ्यावी अन्यथा मोठे आंदोलन झाल्याशिवाय राहणार नाही अशी मागणी करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments