बाणेगावच्या शिरपेचात मानाचा तुरा; सौरभच्या यशाचे सर्वत्र कौतुक
जालना / संतराम जाधव
बाणेगाव (ता. घनसावंगी) येथील विद्यार्थी सौरभ रामनाथ गोरे याची राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याच्या या उल्लेखनीय यशामुळे बाणेगावच्या शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जलतरण क्षेत्रात आपल्या कौशल्याच्या जोरावर सौरभने राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड मिळवली असून, त्याच्या या यशामुळे गावाचे नाव उज्ज्वल झाले आहे. सौरभच्या पुढील वाटचालीसाठी ग्रामस्थ, मित्रपरिवार आणि क्रीडाप्रेमींकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
सौरभने राज्यस्तरीय स्पर्धेतही उत्कृष्ट कामगिरी करून यश संपादन करावे आणि भविष्यात राष्ट्रीय स्तरावर गावाचे प्रतिनिधित्व करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.बाणेगावचा अभिमान असलेल्या सौरभ गोरे याला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!

0 Comments