Ticker

6/recent/ticker-posts

बिलोली येथे श्री शिव हनुमान मंदिर देशमुख नगर यांच्यावतीने दिवाळी पहाट, गीत गायन स्पर्धा व रांगोळी स्पर्धेचे आयोजन ..



दैनिक लोकयुवा बिलोली तालुका प्रतिनिधी : विनोद वाघमारे 

बिलोली तालुक्यातील आजूबाजूच्या परिसरातील सर्व रसिकांना कळविण्यात येते की सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्री शिव हनुमान मंदिर संस्थान देशमुख नगर बिलोली यांच्या वतीने दिवाळीनिमित्त दिनांक आठ व नऊ नोव्हेंबर रोजी दिवाळी पहाट, गीत गायन स्पर्धा व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी सर्वांनी या गीत गायनाच्या कार्यक्रमाचा तसेच विविध स्पर्धांचा आनंद घ्यावा लाभ घ्यावा. 

दिनांक आठ नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजता दिवाळी पहाट शिवाजी मोकळे आणि संच धर्माबाद तसेच गीत गायन स्पर्धा व नऊ नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ ते अकरा रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे या दोन्ही स्पर्धेतील स्पर्धकांना अनुक्रमे 1501, 1001, 701 व 501 रुपयांचे नगदी पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येतील सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत .या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. गोपाळ चौधरी बिलोली हे करणार आहेत.आपली नाव नोंदणी पवन किराणा स्टोअर्स देशमुख नगर मंदिराच्या बाजूला यांच्याकडे दिनांक सात नोव्हेंबर पर्यंत करावी असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आलेले आहे..

Post a Comment

0 Comments