Ticker

6/recent/ticker-posts

हजारो कोटींच्या जलसंधारणानंतरही परभणी जिल्ह्यावर पाणीटंचाईचे सावट!


नऊ तालुके पाणीटंचाई क्षेत्र घोषित; भूजल पातळी ४.२६ मीटरने खालावली

ज्ञानदेव कुदळे@ दैनिक लोक युवा    प्रतिनिधी

परभणी : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विविध जलसंधारण योजना राबवूनही परभणी जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट गंभीर होत आहे. भूजल पातळीत झालेली घट आणि पर्जन्यतूट लक्षात घेता परभणी, जिंतूर, सेलू, पाथरी, मानवत, पूर्णा, गंगाखेड, पालम आणि सोनपेठ या नऊ तालुक्यांतील ग्रामीण व नागरी क्षेत्रे पाणीटंचाई क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत.

प्रशासनाच्या माहितीनुसार जिल्ह्यात भूजल पातळी सरासरी ४.२६ मीटरने खालावली आहे. त्यामुळे ६० मीटरपेक्षा अधिक खोल विहिरी किंवा बोअरवेल खोदण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांपासून ५०० मीटर परिसरात नवीन विहीर किंवा बोअरवेल खोदण्यासही बंदी आहे. 

दरम्यान, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या येलदरी व सिद्धेश्वर धरणातील पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करण्याची गरज आहे. जलसंधारणावर झालेला खर्च, पूर्ण झालेली कामे आणि प्रत्यक्ष भूजल पुनर्भरण यांचा स्वतंत्र आढावा घेण्याची मागणी होत आहे.

योजना कागदावर नव्हे, तर प्रत्यक्ष जलसाठ्यात आणि नागरिकांच्या नळाला पाणी मिळण्यात दिसली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments