दैनिक लोक युवा प्रतिनिधी ज्ञानदेव कुदळे
परभणी: पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी जिंतूर तालुक्यातील आडगाव दराडे परिसरातील ऊसतोड मजुरांच्या पालावर भेट देऊन त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली. यावेळी त्यांनी मजुरांच्या लहान मुलांना नवीन कपडे आणि मिठाईचे वाटप केले. अचानक पालावर पोहोचलेल्या पालकमंत्र्यांनी मुलांशी संवाद साधत त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविला.
ऊसतोडणीसाठी गाव सोडून स्थलांतर करणाऱ्या मजूर कुटुंबांना अनेकदा दिवाळीचा सणही साजरा करता येत नाही. तात्पुरत्या पालांमध्ये राहणाऱ्या या कष्टकरी कुटुंबांच्या अडचणी लक्षात घेऊन हा उपक्रम राबविण्यात आला.
दरम्यान, परभणी जिल्ह्यातील ३ लाख ३६ हजार ३८० पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात १६८ कोटी १९ लाख रुपयांची दिवाळी अग्रीम मदत जमा झाल्याची माहिती आहे.

0 Comments