Ticker

6/recent/ticker-posts

देवहिवरा पाणीप्रश्नासाठी १०० महिलांचा हंडा मोर्चा; आ. हिकमत दादा उढाण यांच्या पुढाकाराने टँकर मंजूर!



पाणीटंचाईने त्रस्त महिलांचा तहसील कार्यालयात आक्रोश; ४० नागरिकांचाही सहभाग, प्रशासनाच्या तातडीच्या निर्णयाने गावाला दिलासा

जालना / संतराम जाधव

देवहिवरा गावातील तीव्र पाणीटंचाईच्या प्रश्नावर अखेर प्रशासनाने सकारात्मक पाऊल उचलले असून, गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आमदार हिकमत दादा उढाण यांनी या प्रश्नात तातडीने लक्ष घालून संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यामुळे गावकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

देवहिवरा गावात पाण्याची समस्या गंभीर बनल्याने महिलांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. या पार्श्वभूमीवर गावातील सुमारे १०० महिला हंडे घेऊन पाणीप्रश्नासाठी पुढे आल्या. त्यांच्यासोबत ४० नागरिकांनीही सहभाग नोंदवत प्रशासनाकडे पाणीपुरवठ्याची मागणी केली.यावेळी महिलांनी घनसावंगी तहसील कार्यालयात जाऊन पाणीटंचाईची समस्या प्रशासनासमोर मांडली. गावातील पाणीप्रश्न तातडीने सोडविण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.

आमदारांच्या पुढाकाराने प्रशासनाची तत्परता

देवहिवरा येथील पाणीटंचाईची माहिती मिळताच आमदार हिकमत दादा उढाण यांनी तात्काळ लक्ष घातले. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी फोनद्वारे संपर्क साधून गावातील परिस्थितीची माहिती दिली आणि पाणीपुरवठ्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली.आमदारांच्या पाठपुराव्यानंतर उपविभागीय अधिकारी (SDM) यांनी देवहिवरा गावासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे आदेश दिले. त्यामुळे पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या महिला व ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पाणीप्रश्न सुटल्याने ग्रामस्थांत समाधान

पाणीटंचाईच्या संकटात असलेल्या देवहिवरा गावासाठी टँकर मंजूर झाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. महिलांच्या पाणीप्रश्नाला प्रशासनाने तातडीने प्रतिसाद दिल्याने गावकऱ्यांनी आमदार हिकमत दादा उढाण यांच्या पुढाकाराचे स्वागत केले.गावातील पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत प्रशासनाने नियमित टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.


Post a Comment

0 Comments