Ticker

6/recent/ticker-posts

दुष्काळग्रस्त गावांना मोठा दिलासा! आ. हिकमत दादा उढाण यांच्या पुढाकारातून २१ गावांत टँकरने पाणीपुरवठा सुरू



प्रशासनाकडून टँकर प्रस्तावांना तात्काळ मंजुरी; जालना ग्रामीण, घनसावंगी आणि अंबड ग्रामीणमधील पाणीटंचाईग्रस्त गावांना दिलासा

जालना / संतराम जाधव

घनसावंगी विधानसभा मतदारसंघात भीषण दुष्काळामुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आमदार हिकमत दादा उढाण यांच्या पुढाकारातून आणि प्रशासनाकडील सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मतदारसंघातील २१ गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. प्रशासनाकडून संबंधित गावांचे टँकर प्रस्ताव तात्काळ मंजूर करण्यात आल्याने पाणीटंचाईग्रस्त गावांतील नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी होणारी भटकंती कमी होण्यास मदत होणार आहे.

घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील अनेक गावांमध्ये दुष्काळाच्या तीव्रतेमुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. नागरिकांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत असल्याची परिस्थिती लक्षात घेऊन आमदार हिकमत दादा उढाण यांनी पाणीटंचाईचा प्रश्न प्राधान्याने हाती घेत प्रशासनाकडे पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नातून विविध गावांचे टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून संबंधित गावांमध्ये पाणीपुरवठा सुरू झाला आहे.

जालना ग्रामीणमधील गावांचा समावेश

जालना ग्रामीणमधील चितळी पुतळी, विरेगाव आणि शिंगाडे पोखरी या गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

घनसावंगी तालुक्यातील गावांना दिलासा

घनसावंगी तालुक्यातील दहेगव्हाण, यावलपिंप्री तांडा, हातडी, बेलवाडी, शिंदखेड अंतर्गत शिंदखेड तांडा, बोरगाव खुर्द व भीमनगर, मासेगाव व माऊलीनगर, भेंडाळा अंतर्गत भेंडाळा तांडा व बंगलेवाडी, ढाकेफळ अंतर्गत ढाकेफळ तांडा क्र. १ व २, रामगव्हाण, भद्रेगाव तसेच राहेरा अंतर्गत तनवाडी व राहेरा तांडा या गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

अंबड ग्रामीणमधील गावांनाही टँकर मंजूर

अंबड ग्रामीणमधील बेलगाव, सुखापुरी आणि शहापूर या गावांचाही टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या गावांमध्ये समावेश आहे.

पाणीटंचाईवर प्रशासनाशी समन्वय

दुष्काळाच्या संकटात सर्वसामान्य नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी त्रास सहन करावा लागू नये, यासाठी आमदार हिकमत दादा उढाण यांनी पाणीटंचाईचा प्रश्न प्राधान्याने हाताळला आहे. गावोगावी निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईवर लक्ष ठेवून आवश्यक उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाशी समन्वय साधला जात आहे.

दुष्काळग्रस्त गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून पाणीटंचाईच्या संकटात प्रशासनाच्या उपाययोजनांना गती मिळाली आहे.


Post a Comment

0 Comments