Ticker

6/recent/ticker-posts

धाराशिव जिल्ह्यात १७ ऑक्टोबर रोजी भव्य युवा मेळाव्याचे आयोजन; जिल्ह्यातील युवकांना स्नेह निमंत्रण!


तेर प्रतिनिधी | प्रविण बंडे

धाराशिव जिल्ह्यातील युवकांना एकत्र आणण्यासाठी आणि युवा शक्तीला संघटित करण्याच्या उद्देशाने शनिवार, दिनांक १७ ऑक्टोबर २०२६ रोजी भव्य युवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील सर्व युवकांना स्नेह निमंत्रण देण्यात आले आहे.

अनंत विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या आशीर्वादाने व परमपूज्य कानिफनाथ महाराज यांच्या दिव्य प्रेरणेने या भव्य युवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

शनिवारी सकाळी १० वाजता मेळावा

हा युवा मेळावा शनिवार, १७ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता धाराशिव येथील स्वयंवर मंगल कार्यालय, बार्शी नाका येथे आयोजित करण्यात आला आहे.

या मेळाव्याच्या माध्यमातून युवकांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन युवा शक्तीचे संघटन करावे, तसेच धर्म, संस्कार आणि समाजसेवेचा संकल्प करावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे!

धाराशिव जिल्ह्यातील सर्व युवकांनी या युवा मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून मेळाव्याची शोभा वाढवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. युवकांमध्ये एकजूट निर्माण करणे, सामाजिक बांधिलकी जोपासणे आणि समाजसेवेच्या कार्याला चालना देणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.

“चला, एकत्र येऊया! युवा शक्ती संघटित करूया! धर्म, संस्कार आणि समाजसेवेचा संकल्प करूया!”


Post a Comment

0 Comments