Ticker

6/recent/ticker-posts

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला सावंतांचा आधार; २ लाखांची मदत, दोन मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेत स्वीकारली पालकत्व.



दैनिक लोक युवा भूम (कुणाल लगाडे) - 


 भूम तालुक्यातील जयवंतनगर येथील योगेश दिनकर जाधवर ३० वर्षीय शेतकरी युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली,या शेतकरी युवकाच्या पश्चात पत्नी,आठ वर्षीय मुलगा व चार वर्षाची मुलगी तसेच आई-वडील असा परिवार असून आत्महत्येची दुर्दैवी बाब मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्रा.डॉ.तानाजीराव सावंत श यांना माहीत झाल्यानंतर त्यांनी स्थानिक पदाधिकारी यांना सांगून कुटुंबीयांची भेट घ्यायला पाठवले व तसेच आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना तत्काळ दोन लाख रुपयाची आर्थिक मदत सुपूर्त केली व आत्महत्याग्रस्त कुटुंबातील दोन मुलांचे शैक्षणिक जबाबदारी घेत पालकत्व आ.सावंतांनी स्वीकारले.भूम परंडा वाशी मतदारसंघाचे आमदार प्रा.डॉ. तानाजीराव सावंत यांनी तमाम जनतेला आव्हान केले आहे की दुष्काळाचे संकट जरी आपल्या भागात गडद असले तरी मायबाप जनतेने धीर न सोडून देता,आपण एकमेकांच्या हातात हात देऊन या संकटाला सामोरे जाऊ परंतु कृपा करून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल कोणीही उचलू नये असे मत दूरध्वनीवरून कुटुंबीयांना बोलताना व्यक्त केले.2 लाख रुपये मदतीचा धनादेश आत्महत्या ग्रस्त कुटुंबियाना सुपूर्त करते प्रसंगी शिवसेना मा. युवा जिल्हाप्रमुख डॉ.चेतन बोराडे,पं.स.सभापती विशाल ढगे,बालाजी गुंजाळ,सुनील भोईटे,रामकिसन गव्हाणे,युवराज हुंबे,अजित पवार,प्रशांत काका मुंडेकर,गजेंद्र खुणे,सागर गटकळ,विजय जाधव,नारायण मोराळे,अंगद नागरगोजे,नामदेव नागरगोजे, गोरख नागरगोजे,मोहन नागरगोजे मतदार संघातील प्रमुख पदाधिकारी,स्थानिक लोकप्रतिनिधी, गावातील प्रतिष्ठित नागरिक,शेतकरी बांधव आदी उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments