दैनिक लोक युवा जिल्हा प्रतिनिधी (नितीन राठोड)
वेळ, या. वाई, जि. सातारा: सेवा संकल्प अभियानांतर्गत दिनांक 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर 2026 या कालावधीत ग्रामपंचायत येथे जलसंधारण व लोकसहभागातून विकास कामांना चालना देण्यात येत आहे. याच अनुषंगाने दिनांक 13 ऑक्टोंबर 2026 रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्रीमती याशनी नागराज मॅडम यांनी ग्रामपंचायत वेळे येथे देऊन जलसंधारणाच्य कामासह जल्लोतारा कामाची प्रत्यक्ष पाहणी केली.
या अभियानांतर्गत श्रमदानासाठी महिला बचत गटाची सहभाग नोंदवला असून, लोकसहभागातून जलसंधारणाच्या कामांना प्रोत्साह मिळत आहे. जलतरा कामामुळे शेतकऱ्यांना पाणी साठवणूक व जलसंधारणाच्या दृष्टीने लाभ होण्याची अपेक्षा असून, कामाच्या माध्यमातून स्थानिक मजुरांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाने वातावरण निर्माण झाले आहे.
ग्रामीण भागातील पाणीटंचाईवर मात करणे पावसाच्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे भूजल पातळी सुधारण्यास हातभार लावणे आणि शेतीसाठी जलसंधारणाच्या सुविधा निर्माण करणे, या उद्देशाने व अशा कामाचे महत्त्व अधोरेखित होत आहे. शासनाच्या अभियानाला ग्रामपंचायत, महिला बचत गट, शेतकरी आणि ग्रामस्थांच्या लोकसहभागाची जोड मिळाल्यास गावाच्या शाश्वत विकासाला चालना मिळो शकते.
प्रमुख अधिकारी व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
या पाहणीप्रसंगी सहाय्यक गट विकास अधिकारी श्री. महेंद्र सपाटे ,गट विभाग अधिकारी सौ. नेहा चिकणे पंचायत समिती वाईचे गट विभाग अधिकारी श्री. नारायण घोलप, विस्तार अधिकारी श्री. राहुल हजारे व श्री. शरद गायकवाड पॅनल तांत्रिक अधिकारी निरंजन पवार उपस्थित होते .
तसेच ग्रामपंचायत वेळेच्या सरपंच सौ. राजेंद्र गायकवाड, उपसरपंच सौ. सिंधू अर्जुन ढमाळ, ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती श्रुतिका हणमंत जाधव, ग्रामरोजगार सहाय्यक श्री . प्रशांत शिंदे, कृषी सहाय्यक श्रीमती दिशा भांबळे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष श्री. सुरेश पवार, ग्रामपंचायत सदस्य श्री. दशरथ पवार यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका महिला बचत गटाच्या प्रतिनिधी, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
लोकसहभागातून ग्रामविकासाचा संकल्प
सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून प्रशासन आणि ग्रामपंचायत यांच्यातील समन्वय, महिला बचत गटाचा सक्रिय सहभाग शेतकऱ्याचे हित आणि स्थानिक रोजगारनिर्मिती यांचा महत्त्व प्राप्त होत आहे. जलसंधारणाची कामे ही केवळ पाणी साठवणुकीपूरती मर्यादित नसून, ती शेती, रोजगार आणि गावाच्या भविष्यातील जलसुरक्षेशी निगडित आहेत.
लोकसहभागातून जलसंधारण, श्रमदानातून ग्रामविकास आणि रोजगारातून ग्रामीण कुटुंबांना आधार या भावनेतून ग्रामपंचायत वेळे येथे सुरू असलेले प्रयत्न गावाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहेत.

0 Comments