Ticker

6/recent/ticker-posts

नंदुरबार जिल्ह्यातील रखडलेले सिंचन प्रकल्प मार्गी लागणार; शेतकऱ्यांना लवकरच पाणी मिळण्याची आशा


जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक; सहा मध्यम व नऊ लघु प्रकल्पांवर चर्चा


दैनिक लोक युवा धडगाव प्रतिनिधी :अर्जुन पावरा

नंदुरबार : जिल्ह्यातील अनेक वर्षांपासून रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करून शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीत नंदुरबार जिल्ह्यातील सहा मध्यम प्रकल्प आणि नऊ लघु प्रकल्पांच्या सद्यस्थितीचा आढावा घेऊन प्रकल्पांद्वारे शेतकऱ्यांना लवकरात लवकर पाणी उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा करण्यात आली.

बैठकीपूर्वी धुळे जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर तापी-बुराई तसेच नंदुरबार जिल्ह्यातील विविध सिंचन प्रकल्पांबाबत चर्चा झाली. रखडलेले प्रकल्प मार्गी लावून सिंचनाचा प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यावर यावेळी भर देण्यात आला.

या बैठकीस आमदार आमशादादा पाडवी, आमदार चंद्रकांत रघुवंशी, जलसंपदा विभागाचे मुख्य सचिव डवळे, प्रधान सचिव, सचिव, तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक, जळगाव, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता, जळगाव तसेच धुळे पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

नंदुरबार जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प पूर्ण झाल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. या प्रकल्पांच्या माध्यमातून शेतीसाठी पाणी उपलब्ध होऊन सिंचन क्षेत्र वाढण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. शेतकऱ्यांना लवकरात लवकर पाणी मिळावे, यासाठी प्रकल्पांबाबत सकारात्मक निर्णय घेऊन पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश मंत्र्यांकडून देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

या बैठकीस के. टी. गावित, अरुण गावित, देवमन पवार, सरपंच राजेश वसावे यांच्यासह नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी उपस्थित होतेजिल्ह्यातील रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण होऊन शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचणार का, याकडे आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागलेचर्चा 




Post a Comment

0 Comments