तेर (प्रतिनिधी) : पावसाळा संपत असतानाच धाराशिव जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट गडद होऊ लागले आहे. वाढते तापमान, पाण्याचे बाष्पीभवन आणि खालावणारी भूजलपातळी यामुळे आगामी उन्हाळ्यात पाणीपुरवठ्याच्या आणीबाणीची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. अशी माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सोमवार, दि. १२ ऑक्टोबर रोजी झालेल्या या पत्रकार परिषदेस नितीन काळे, सतीश दंडनाईक, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नेताजी पाटील, नगराध्यक्षा नेहा काकडे, युवराज नळे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार पाटील म्हणाले की, जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांमध्ये ११ ऑक्टोबर रोजी केवळ ६.४४ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. पुढील दहा महिने उपलब्ध पाणी पुरवून वापरावे लागणार आहे.
वाढत्या तापमानामुळे मागील ४१ दिवसांत जलसाठ्यात झपाट्याने घट झाली आहे. धरणांत केवळ ६.४४ टक्के पाणी असल्याने नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा.

0 Comments