प्रतिनिधी पवन शिरभाते आर्वी जिल्हा वर्धा.
"श्री संताजी अखिल तेली समाज संघटन बीड. मा. संदीप क्षिरसागर साहेब आमदार बीड यांनाओबीसीच्या विषयाचा केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात यावा यासाठी सौ अंबिका दिनेश खडके महीला जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.
१)जनगणनेच्या पत्रिकेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम समाविष्ट करण्यात यावा जेणेकरून ओबीसींची मुलभूत आकडेवारी कळेल,त्यानुसार शासकीय योजना आणुन ओबीसींचे उत्थान करता येईल.ओबींसीची आर्थिक, सामाजिक शैक्षणिक विकासाची आकडेवारी कळेल आणि ओबीसींचा विकास होण्यास न्याय मिळेल.यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा अशी मागणी करण्यात आली.
२)UGC कायद्यात ओबीसींना समाविष्ट केल्यानंतर UGC कायदा अंमलात आणावा.जेणेकरून ओबीसी विद्यार्थ्यांवरती शैक्षणिक संस्थांमध्ये होत असलेल्या भेदभावावरती रोकथाम होईल.ओबींसी विद्यार्थ्यांवरती अन्याय होणार नाही.ओबीसी विद्यार्थ्यांना कायदेशीर संरक्षण मिळेल.या विषयावर आपण केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून ओबीसींना योग्य न्याय मिळवून द्यावा.अशी मागणी श्री संताजी अखिल तेली समाज संघटन बीड जिल्ह्याद्वारे करण्यात आली.
उपस्थित पदाधिकारी श्री सौ अंबिका दि.खडके महीला जिल्हाध्यक्ष बीड,
श्री सुरेन्द्र शिंदे जिल्हाध्यक्ष बीड,सौ वैशाली खर्डीकर मही.जिल्हा सचिव,सौ संध्या खर्डीकर मही.उपाध्यक्ष बीड,श्री दिनेश खडके जिल्हा उपाध्यक्ष बीड,श्री.सोमनाथ ननावरे,श्री किशोर जाधव ई.उपस्थित होते. श्री संताजी अखिल तेली समाज संघटनेचे लोकप्रिय संघटक श्री अनिलजी बजाईत

0 Comments