Ticker

6/recent/ticker-posts

दुष्काळाच्या संकटात घाबरू नका, खचून जाऊ नका; आ. डॉ. तानाजीराव सावंत



भूम (कुणाल लगाडे) : 

यंदा मराठवाड्यावर दुष्काळाचे गंभीर सावट पसरले असून संपूर्ण महाराष्ट्रातील तब्बल ८५ टक्क्यांहून अधिक भाग दुष्काळाच्या छायेत आहे. अशा अत्यंत बिकट व भीषण परिस्थितीत भूम परंडा वाशी मतदारसंघाचे आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी थेट भूम तालुक्यातील अंबी गावच्या परंडा-वाशी-. प्रत्यक्ष शेतात उतरून त्यांनी नुकसान झालेल्या पिकांची व दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली आणि बळीराजाचे दुःखाश्रू पुसण्याचा प्रयत्न केला.यंदाच्या हंगामात पावसाने पाठ फिरवल्यामुळे खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. तर दुसरीकडे, पावसाच्या अभावाने रब्बी हंगामही हातातून गेले आहे. गेल्या वर्षी अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाने केलेले नुकसान, तर यंदा पडलेला भीषण दुष्काळ यामुळे बळीराजा पार कोलमडून गेला असून त्याच्या हाल अपेष्टांना सीमा उरलेली नाही. 

ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांनी अंबी गावातील शेतकरी बांधवांशी आस्थेने संवाद साधत त्यांची विचारपूस केली.या कठीण प्रसंगी शासनाच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला जाईलच, शिवाय ‘वैयक्तिक स्तरावरूनही मी शक्य ती सर्व मदत करेन’ असा शब्द त्यांनी शेतकऱ्यांना दिला. संकट खूप मोठे आहे, परंतु या भीषण परिस्थितीत कुणीही खचून जाऊ नका; कोणतीही अडचण किंवा समस्या असल्यास थेट माझ्याशी संपर्क साधा, आपण सर्वजण एकत्र मिळून यातून निश्चित मार्ग काढू, असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच नैराश्यातून कोणीही आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये, असे कळकळीचे आणि भावूक आवाहनही त्यांनी शेतकरी बांधवांना केले याप्रसंगी शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments