दैनिक लोकयुवा प्रतिनिधी विशाल हलवले
केळापूर : तालुक्यातील नागाई (नागठाणा) येथे आज स्वमान फायनान्शियल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने दुष्काळग्रस्त परिस्थिती लक्षात घेऊन सभासदांना रेशन किटचे वाटप करण्यात आले. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर गरजू सभासदांना मदतीचा हात देत कंपनीने सामाजिक बांधिलकी जपण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला.
या उपक्रमासाठी गावचे सरपंच शेषेराव ताजने सर, ग्रामीण बँक अध्यक्ष (सोसायटी) अमरत पाझरे सर, तसेच स्वमान फायनान्शियल सर्व्हिसेसचे ZM अमोल टीमापुरे सर व SH मंगेश मेश्राम सर यांचे मार्गदर्शन लाभले.
यावेळी RM दीपक झोरे सर, AM राजेंद्र लांडगे सर, BM विशाल निवडगे सर, BM जयदीप राठोड प्रवीण तसेच आनंद उप्पलवार सर,शुभम सिडाम सर ,ललित सर, अजय सर,सुशांत सर, हिना मॅडम शीतल मॅडम कंपनीचे सर्व कर्मचारी वर्ग आणि गावातील सभासद उपस्थित होते.
दुष्काळाच्या कठीण परिस्थितीत सभासदांना मदतीचा आधार देणाऱ्या स्वमान फायनान्शियल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडच्या या सामाजिक उपक्रमाचे गावकऱ्यांकडून कौतुक करण्यात येत आहे.

0 Comments