Ticker

6/recent/ticker-posts

इंदिरानगर भूम येथे कायदेविषयक शिबिर उत्साहात संपन्न



भूम (कुणाल लगाडे) :  

इंदिरा नगर, भूम येथील धम्म देसना बुद्ध विहारात भूम तालुका विधी सेवा समिती, तालुका वकील संघ आणि नगर परिषद (भूम) यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.नागरिकांनी हक्क व कर्तव्यांबाबत जागरूक राहावे असे न्यायाधीश भगवान पंडित यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका विधी सेवा समिती, भूमचे सचिव तथा न्यायाधीश श्री. भगवान पंडित होते. यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी भारतीय कायदा सक्षम असून प्रत्येक नागरिकाने आपल्या हक्कांसोबतच कर्तव्यांचीही जाणीव ठेवावी, असे आवाहन केले. कायद्याविषयी जागरूकता निर्माण होणे आणि नागरिकांना न्यायव्यवस्थेची माहिती मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) श्री. अमोल रामचंद्र मोहिते यांनी उपस्थित नागरिकांना वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले. वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असे त्यांनी सांगितले.

तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड. आर. आर. सुकाळे यांनी पालकांना मार्गदर्शन करताना अल्पवयीन मुलांच्या हातात मोटारसायकल किंवा अन्य कोणतेही वाहन देऊ नये, असे आवाहन केले. यामुळे अपघात टाळण्यास मदत होईल तसेच संभाव्य कायदेशीर अडचणींपासूनही बचाव करता येईल, असे त्यांनी नमूद केले.या शिबिराचे विशेष आकर्षण म्हणजे अंडर सेव्हन्टीन  ‘महाराष्ट्र केसरी’ किताब पटकावल्याबद्दल श्री. टिपू बबुकर जमादार यांचा भूम वकील संघाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या यशाबद्दल उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन केले.या कार्यक्रमास सर्व वकील संघ सहित यावेळी महावीर बनसोडे, शिवाजी पायाळ, अमोल शिंदे ,बबन सीतापे, नितीन इजगज, आनंद सीतापे, पाटुळे साहेब, बाबासाहेब शिंदे, लक्ष्मण बनसोडे, सूर्यकांत चौरे, राजेंद्र गरड आणि किरण शिंदे, अनिता सोनावणे, उल्का शिंदे, उमा रणदिवे, अविदा मस्के, यादव यांच्यासह परिसरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ विधिज्ञ श्री.सुंदरराव हुंबे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विधिज्ञ ॲड .अमृता गाढवे यांनी केले, तर विधिज्ञ श्री. एस. एस. काळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

कायदेविषयक माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविणे, वाहतूक नियमांविषयी जागरूकता निर्माण करणे आणि सामाजिक बांधिलकी जपणे या दृष्टीने हे शिबिर उपयुक्त ठरले.

Post a Comment

0 Comments