Ticker

6/recent/ticker-posts

श्रीराम विहारातील शारदा देवी उत्सवात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग



विविध स्पर्धांनी वाढविली उत्सवाची शोभा


दैनिक लोकयुवा दिग्रस तालुका प्रतिनिधी/गजानन गंडाळे 

दिग्रस शहरातील श्रीराम विहार परिसरातील महादेव मंदिरात शारदा देवीची स्थापना करण्यात आली असून, या उत्सवानिमित्त संपूर्ण परिसरात भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.  शारदा देवी उत्सवाच्या माध्यमातून धार्मिक परंपरेचे जतन करण्यासोबतच महिलांच्या सुप्त कलागुणांना वाव देणे, त्यांच्यातील आत्मविश्वास वाढविणे आणि सामाजिक एकोपा दृढ करणे या उद्देशाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

उत्सवाच्या निमित्ताने दररोज धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळत आहे. यामध्ये रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची स्पर्धा, गरबा तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश आहे.आजच्या धावपळीच्या जीवनात महिलांना आपल्या कलागुणांचे प्रदर्शन करण्यासाठी आणि एकमेकींशी संवाद साधण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे. 

हीच बाब लक्षात घेऊन शारदा देवी उत्सवाच्या माध्यमातून महिलांना एकत्र आणण्याचा आणि त्यांच्या कलात्मक गुणांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला जात आहे. विविध स्पर्धांमुळे महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, मनोरंजनासोबतच परस्परांतील जिव्हाळा आणि सहकार्याची भावना अधिक दृढ होत आहे.

विशेष म्हणजे, हा उत्सव केवळ धार्मिक कार्यक्रमापुरता मर्यादित न राहता महिला एकजूट, सांस्कृतिक जतन आणि सामाजिक बांधिलकीचे प्रतीक ठरत आहे.विमल खारोडे यांनी श्री शारदा देवीची मूर्ती भेट दिल्याबद्दल मंडळाच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

या संपूर्ण उत्सवाच्या यशस्वितेसाठी अश्विनी मदने, अश्विनी घाडगे,अंजू आडाव, पुष्पा राठोड, पुष्पा आडे, ममता ठाकरे, विजया ठाकरे, सुनीता राठोड, वर्षा राठोड, माधवी निळे, नलिनी खंडारे, अर्चना राऊत, सविता डिके, संगीता अस्वार, वैशाली चिरडे, कविता लाखेकर, संगीता पवार, चंचल राऊत-पोहेकर, कमला वनेरकर,विद्या चिरडे, छाया तिवडकर, संतोषी चौधरी,आदी महिला विशेष परिश्रम घेत आहेत.

Post a Comment

0 Comments