Ticker

6/recent/ticker-posts

ग्रामपंचायत कोपामांडवी येथे श्रमदानातून वनराई बंधाऱ्याची उभारणी



दैनिक लोकयुवा प्रतिनिधी विशाल हलवले 

केळापूर : दिनांक 25 ऑक्टोबर ग्रामपंचायत कोपमांडवी येथे ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेतून जलसंधारणाला चालना देण्यासाठी कोपामांडवी येथे श्रमदानाच्या माध्यमातून वनराई बंधाऱ्याची उभारणी करण्यात आली. या उपक्रमामुळे पावसाचे पाणी अडवून भूजलपातळी वाढविण्यास तसेच परिसरातील पाणीटंचाई कमी करण्यास मदत होणार आहे.

गावाच्या विकासासाठी आणि जलसंधारणाच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमात ग्रामस्थांनी श्रमदानातून सहभाग नोंदविला. ग्रामीण भागात पाण्याचे महत्त्व लक्षात घेता, वनराई बंधाऱ्यामुळे पाण्याचा साठा वाढण्यास आणि शेतीसाठी पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

या वेळी माजी सरपंच हनमंतु कायपेल्लीवार, ग्रामपंचायत सचिव आर. आर. परचाके, ग्रामपंचायत रोजगार सेवक अशोक खामनकर, ग्रामपंचायत कर्मचारी गंगाराम मोहीजे आणि ग्रामपंचायत संगणक परीचालक विशाल हलवले उपस्थित होते.

लोकसहभाग आणि श्रमदानातून जलसंधारणाची कामे केल्यास गावाच्या पाणी समस्येवर उपाययोजना करता येऊ शकतात. कोपामांडवी येथे राबविण्यात आलेला हा उपक्रम जलसंधारण आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरत आहे.लोकसहभागातून जलसंधारणाचा संदेश देत कोपामांडवी येथे वनराई बंधाऱ्याची उभारणी करण्यात आली.


Post a Comment

0 Comments