दैनिक लोकयुवा दिग्रस तालुका प्रतिनिधी/गजानन गंडाळे
आर्य वैश्य ज्येष्ठ नागरिक मंडळ, नागपूर यांच्या वतीने आयोजित १४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आर्य वैश्य समाज, दिग्रसचे अध्यक्ष तथा दिग्रस नगर परिषदेचे उपाध्यक्ष व पाणीपुरवठा सभापती *सचिन बनगिनवार यांचे मंडळाच्या वतीने स्वागत करण्यात आले.
शनिवार, दि. ३ ऑक्टोबर २०२६ रोजी आनंदाश्रम परिसर, कान्होलीबारा रोड, टाकळघाट येथील सभागृहात ही सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी किशोर बिरेवार, विजय मारावार, प्रकाश उपगनलावार यांच्यासह समाजातील अन्य मान्यवर उपस्थित होते.
सभेमध्ये दिवंगत समाजबांधवांना श्रद्धांजली अर्पण करणे, मागील सभेचे इतिवृत्त, वार्षिक कामकाजाचा अहवाल, आर्थिक ताळेबंद व अंदाजपत्रकाला मंजुरी तसेच आनंदाश्रम प्रकल्पाच्या प्रगतीबाबत माहिती देणे आदी विषयांचा समावेश होता.
या सभेच्या निमित्ताने सचिन बनगिनवार यांचा करण्यात आलेला सन्मान हा आर्य वैश्य समाजातील सामाजिक स्नेह आणि परस्पर एकोपा अधोरेखित करणारा ठरला.

0 Comments