Ticker

6/recent/ticker-posts

केंद्रीय पथकाचा दुष्काळी भागात भरारी दौरा!


*ना शेतकऱ्यांशी संवाद, ना दुष्काळग्रस्तांना दिलासा; प्रशासनाच्या दौऱ्यावर प्रश्नचिन्ह.*

सांगोला तालुका ग्रामीण प्रतिनिधी.आण्णासाहेब खरात 

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्याती दुष्काळी परिस्थिती गंभीर होत असताना केंद्रीय पथकाच्या भरारी दौऱ्याकडून शेतकरी आणि ग्रामस्थांना मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र केंद्रीय पथकाकडून शेतकऱ्यांना भेट देण्यासाठी त्यांच्या शेतात जाणे गरजेचे होते परंतु याविषयी त्यांनी शेतकऱ्यांच्या शेतात न जाता फक्त दुष्काळाच्या नावावर केलेला एक भरारी दौरा असल्याचे दिसून येते तसेच फक्त वाणीचिंचाळे व वाकी (घेरडी) साठवण तलावाच्या भागास भेट देऊन पाच मिनिटात दौरा आवरता घेतला.

*• फक्त वाणीचिंचाळे व वाकी (घेरडी) साठवण तलावाला 5 मिनिट भेट, शेतात न जाताच दौरा गुंडाळला.*

 *दुष्काळी भागातील वास्तव दुर्लक्षित* 

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती गंभीर होत असताना केंद्रीय पथकाच्या भरारी दौऱ्याकडून शेतकरी आणि ग्रामस्थांना मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र केंद्रीत पथकाकडून शेतकऱ्यांना भेट देण्यासाठी त्यांच्या शेतात जाणे गरजेचे होते परंतु याविषयी त्यांनी शेतकऱ्यांच्या शेतात न जाना फक्त दुष्काळाच्या नावावर केलेला एक भरारी दौरा असल्याचे दिसून येते. तसेच फक्त वाणीचिंचाळे व वाकी (घे) साठवण तलावाच्या भागास भेट देऊन पाच मिनिटात दौरा आवरता घेतला.

दुष्काळामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. जनावरांच्या चाऱ्याची टंचाई आता असह्य होऊ लागली असून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी पीक न आल्याने चिंतेत असून कर्जाचा बोजा वाढला आहे.

दौरा झाला मात्र शेतकऱ्यांच्या व्यथा कोण ऐकणार असा सवाल आता केला जात आहे. दुष्काळग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसल्याची भावना ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली आहे. प्रत्यक्ष शेतात न जाणे, शेतकऱ्यांशी संवाद न करणे यामुळे या दौऱ्याच्या हेतूवरच शंका निर्माण झाली आहे. प्रशासनाने आता स्पष्ट भूमिका मांडून दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले की पाहणी करायची असल्यास शेतापर्यंत येऊन प्रत्यक्ष स्थिती पाहणे गरजेचे होते.

*दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना केवळ पाहणी नको, तर ठोस मदत हवी!*

Post a Comment

0 Comments