Ticker

6/recent/ticker-posts

चीनमध्ये होणाऱ्या ३२ व्या जागतिक जिम्नॅस्टिक स्पर्धेत वरुडच्या लेकीचा डंका, महाराष्ट्रातून १४ मध्ये वरुडच्या राहिन्याचा समावेश



दैनिक लोक युवाआर्वी  प्रतिनिधी:पवन शिरभाते.

.

वरुड : जिल्हा अमरावती  शहरातील कु. राहिन्या राहुल गुल्हाने हिची चीनमधील नानजिंग येथे दि. १२ ते १५ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या ३२ व्या जागतिक जिम्नॅस्टिक स्पर्धेसाठी निवड झाली असून तिने समाजाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

ती नागपूर येथील सेंट रिसेंट पॅलोटी शाळेतील ८ व्या वर्गातील विद्यार्थिनी असून भारतीय जिम्नॅस्टिक संघातर्फे नुकत्याच पुणे येथे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय जिम्नॅस्टिक टेम्पोलिंग आणि टम्बलिंग स्पर्धेतून ही निवड प्रक्रिया पार पडली. निवड झालेल्या २३ स्पर्धकांमध्ये महाराष्ट्रातून एकूण १४ स्पर्धकांची निवड झाली असून त्यामध्ये वरुडच्या राहिन्याचा समावेश असल्याने सर्वत्र तिचे कौतुक होत आहे.

यावेळी प्रदेश अध्यक्ष अनिल वि. बजाईत,प्रदेश उपाध्यक्ष अविनाश ल. टाके, प्रदेश उपाध्यक्ष प्रितीताई चौधरी, विदर्भ प्रमुख अरुण म. कहारे, विदर्भ प्रसिद्धी प्रमुख प्रा. सुरेंद्र गोठाणे, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर वा. आसोले, ज्येष्ठ पत्रकार पवनभाऊ शिरभाते, ज्येष्ठ मार्गदर्शक प्रकाशभाऊ जैसिंगपुरे, अरुण जैसिंगपुरे, पत्रकार सतिशजी शिरभाते, ज्येष्ठ मार्गदर्शक जगनराव गाठे, माजी सभापती प्रकाश गुल्हाणे, भाजपा आर्वी शहराध्यक्ष राहुल गोडबोले, वर्धा जिल्हा प्रमुख प्रविण शेलोकार, वधू-वर परिचय मेळाव्याचे संस्थापक अरुण धांडे, सामाजिक कार्यकर्ते प्रा. सुनिलजी साखरकर, प्रविण बिजवे, प्रा. उमेश टाके, पंकज साकोरे, विशुभाऊ आगलावे, प्रा. तथा नगरसेवक मनोज आगरकर, सुनील टाके, प्रा. गणेश टाके, सामाजिक कार्यकर्ते संजय सिंहे, विनायक जैसिंगपुरे, अनिल गुल्हाणे, मनोहर भांगे, हर्षल भांगे, नरेंद्र घोडखांदे, अतुल जैसिंगपुरे, सुमित शिंगाणे, विवेक वासेकर, प्रमोद गाठे, नितीन खुणे, गुणवंत गुल्हाणे, संजय भांगे, इत्यादी समाज बांधवांनी कु. राहिन्या गुल्हाने हिचे अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

यावेळी तिचे वडील राहुल गुल्हाने, आई भारती गुल्हाने, काका अतुल गुल्हाणे, काकू अंकिता गुल्हाने आदी कुटुंबीय उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments