दैनिक लोकयुवा भूम (कुणाल लगाडे) :
टपाल विभागाच्या राष्ट्रीय स्तरावरील ‘ढाई अक्षर’ पत्रलेखन मोहिमेला भूममध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भूम उपविभाग अंतर्गत डाक निरीक्षक सिद्धेश्वर दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली ढाई अक्षर पत्रलेखन मोहीम भूम येथील रवींद्र हायस्कूल आणि गुरुदेव दत्त हायस्कूल येथे पत्रलेखन मोहिम घेण्यात आली.या मोहिमेची संकल्पना ‘धरती मातेला पत्र:निसर्गाचे रक्षण करण्याचे माझे वचन’ अशी होती. या मोहिमेत भूम येथील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या विषयांतर्गत विद्यार्थ्यांनी पत्रलेखनही करून आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी डाक आवेक्षक प्रदीप लगाडे, यश जाधव, कृष्णा कोठावळे, तोहिद बेग हे डाक सेवक उपस्थित होते.

0 Comments