Ticker

6/recent/ticker-posts

वसंतनगरच्या सुपुत्राला अखेरचा निरोप



सीआरपीएफ जवान जय चव्हाण यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार


दैनिक लोकयुवा दिग्रस तालुका प्रतिनिधी/ गजानन गंडाळे 

 दिग्रसपासून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या वसंतनगर या मूळ गावी केंद्रीय राखीव पोलीस दलातील जवान जय लालसिंग चव्हाण यांच्यावर आज सकाळी ११ वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी असंख्य अधिकारी , कर्मचारी , राजकीय पुढारी , सामजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते . याबाबत सविस्तर असे की तालुक्यातील वसंतनगर येथील ५६ वर्षीय जय लालसिंग चव्हाण मागील काही दिवसांपासून मुंबई येथे प्रदीर्घ आजारामुळे उपचार घेत होते .

मात्र काळ त्यांची प्राणज्योत मावळली दिग्रस येथे त्यांचे पार्थिव आज पहाटे पोहोचले यवतमाळ-वाशीमचे खा संजय देशमुख यांनी सर्वप्रथम येथील विश्रामगृहावर पार्थिवाचे दर्शन घेत श्रद्धांजली वाहिली . वसंतनगर येथे सकाळी ११वाजता त्यांच्या मूळ गावी , वसंतनगर येथे शासकीय इतमामात तसेच अत्यंत शोकाकुल वातावरणात जय चव्हाण यांचे अंत्यसंस्कार पार पडले . त्यांच्या मागे पत्नी , दोन मुले व परिवार रातील इतर सदस्य आहेत . 

यावेळी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते महादेव सुपारे , शिवसेना तालुका प्रमुख उत्तम ठवकर , बाबूसिंग जाधव , एल पी राठोड , माजी जिल्हा परिषदेचे माजी उपायध्यक्ष किशोर आडे , माजी पंचायत समिती सभापती मिलिंद मानकर , विनोद जाधव , प्रा प्रेम राठोड , विष्णू उकंडे , नायब तहसीलदार सुधाकर राठोड , पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे , विस्तार अधिकारी सरदारसह केंद्रीय राखीव पोलीस दल , पोलीस विभाग , महसूल तसेच इतर विभागातील अधिकारी व कर्मचारी , ग्रामस्थ आदी बहुसंख्येने उपस्थित होते .


Post a Comment

0 Comments