Ticker

6/recent/ticker-posts

महारुद्र अकॅडमीमध्ये एकदिवसीय OLTP प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात संपन्न



मनाची एकाग्रता, ध्यान-योग आणि ध्येय निश्चितीबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन


सतीश बनसुडे, पुणे प्रतिनिधी, दैनिक लोकयुवा

पळसदेव येथील महारुद्र स्पोर्ट्स & करिअर अकॅडमीमध्ये लहान मुलांच्या मानसिक विकासासाठी एकदिवसीय OLTP प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम दीपक भैय्या अनपट आणि चेतन भैय्या बनसुडे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात पार पडला.

या प्रशिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना मनाची एकाग्रता वाढविणे, ध्यान-योगाचे महत्त्व, मानसिक शांतता आणि जीवनातील ध्येय अचूकपणे निश्चित करणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. अभ्यास आणि क्रीडा क्षेत्रात यश मिळविण्यासाठी आत्मविश्वास, शिस्त, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि सकारात्मक विचार किती महत्त्वाचे आहेत, हे विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.

खेळाडूंनी शारीरिक क्षमतेसोबतच मानसिकदृष्ट्याही सक्षम असणे आवश्यक आहे. ध्यान-योगाच्या माध्यमातून मन स्थिर ठेवून आपल्या ध्येयाच्या दिशेने सातत्याने वाटचाल करावी, असा प्रेरणादायी संदेश यावेळी देण्यात आला.

या कार्यक्रमासाठी अकॅडमीचे मार्गदर्शक एस.आय. आजिनाथ बनसुडे तसेच नितीन बनसुडे सर उपस्थित होते.विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास, शिस्त आणि नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी महारुद्र अकॅडमी सातत्याने विविध उपक्रम राबवत आहे.महारुद्र स्पोर्ट्स & करिअर अकॅडमी, पळसदेवखेळ हीच आमची ओळख!



Post a Comment

0 Comments