Ticker

6/recent/ticker-posts

आमगव्हाणच्या विद्यार्थ्याची उंच भरारी;वक्तृत्व स्पर्धेत विभागीय स्तरावर प्रथम



दैनिक लोकयुवा दिग्रस तालुका प्रतिनिधी/गजानन गंडाळे 

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विभागस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत उत्कृष्ट यश संपादन करणारा विद्यार्थी अविनाश दिलीप सर्वतकर हा जिल्हा परिषद मराठी शाळा आमगव्हाण येथील आहे.

त्याने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विभागीय स्तर मुलांचे शासकीय वसतिगृह, चिंचबोरा (अमरावती) येथील कनिष्ठ महाविद्यालयीन गटातील (गट : क) विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. या घवघवीत यशामुळे त्याची नागपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठी अमरावती विभागातून निवड करण्यात आली आहे. यामुळे शिक्षकांसह विद्यार्थी यांचेकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रह शताब्दी वर्षानिमित्त आयोजित या स्पर्धेचा मुख्य विषय ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सामाजिक क्रांती आणि आजचा संदर्भ’ असा होता. या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर विद्यार्थ्याने आपल्या प्रभावी व ओघवत्या वाणीने मांडणी करत उपस्थितांची मने जिंकली आणि प्रथम क्रमांक मिळवला. या यशामागे वसतिगृहातील मार्गदर्शन व शिक्षकांचे मोलाचे योगदान लाभले आहे.

स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून मोरे सर यांनी काम पाहिले, तर वसतिगृहाचे गृहपाल आशिष हाडके यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रोत्साहनपर सहकार्याने विद्यार्थ्याने ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे.त्याच्या या यशाबद्दल वसतिगृह परिसर तसेच अमरावती विभागातून विद्यार्थ्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, नागपूर येथील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्याला सर्व स्तरांतून शुभेच्छा देण्यात येत आहेत.

Post a Comment

0 Comments