ट्रॅक्टर अंगावरून गेल्याने २५ वर्षीय चालकाचा जागीच मृत्यू
दैनिक लोकयुवा दिग्रस तालुका प्रतिनिधी/गजानन गंडाळे
शहरातील आरोग्यधाम हॉस्पिटलजवळ सुरू असलेल्या पाण्याच्या टाकीच्या बांधकामावर सोमवारी सकाळी घडलेल्या भीषण अपघातात ट्रॅक्टरचे चाक डोक्यावरून गेल्याने चालक रोहित गजानन पवार (वय २५, रा. रुई तलाव) याचा जागीच मृत्यू झाला.
अनियंत्रित ट्रॅक्टरने लगतच्या चहाच्या कँटीनला जोरदार धडक दिली. या धडकेत कँटीनचे पत्रे तुटून मोठे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी दिग्रस पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून ठाणेदार वैजनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. तरुण वयात मुलाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

0 Comments