Ticker

6/recent/ticker-posts

ज्येष्ठ अभिनेते व नाम फाउंडेशनचे संस्थापक श्री. नाना पाटेकर यांच्या निधनाने वेळे गावावर शोक काळा



दैनिक लोक युवा जिल्हा प्रतिनिधी, नितीन राठोड 

वेळे, ता. वाई जि. सातारा, ज्येष्ठ अभिनेते संवेदनशील सामाजिक कार्यकर्ते आणि नाम फाउंडेशनचे संस्थापक श्री नाना पाटेकर यांच्या दुःखद निधनाची वार्ता अत्यंत वेदनादायी आहे. त्यांच्या निधनाने सामाजिक क्षेत्रासह वेळे गावानेही एक जेवाल्याचा आधार गमावला आहे. पाणीदार वेळे समृद्ध वेळे. हे स्वप्न साकार करण्यासाठी. वेळे गावात सुरू असलेल्या जलसाधरांच्या कार्याला नाम फाउंडेशनने मागील दोन वर्षापासून मोलाचे आणि सातत्यपूर्ण सहकार्य केले. 

जलसंधारण च्या कामासाठी नाम फाउंडेशनच्या माध्यमातून पोकलेन मशीन उपलब्ध करून देण्यात आले. त्यामुळे गावातील जलसंधारणाच्या .कामांना मोठी गती मिळाली. ग्रामीण भागातील पाणी प्रश्न दुष्काळ आणि. जलसंधारणाचे महत्व श्रम साधनसामग्री आणि सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून गावाचा विकासासाठी योगदान देण्याची नानाची भूमिका प्रेरणादायी . होते वेळे गावातील जलसंधारणाच्या कामात मिळालेले त्यांचे सहकार्य हे ग्रामस्थांसाठी कायम स्मरणात राहणारे आहे. 

नानाची योगदान केवळ पडद्यावरील अभिनयापुरते मर्यादित नव्हते. गरजूंसाठी मदतीचा हात, ग्रामीण विकासासाठी पुढाकार आणि समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळ ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख होती. त्यामुळे त्यांच्या जाण्याने एक ज्येष्ठ कलावंतच नव्हे तर समाजासाठी संवेदनशील पणे काम करणारे व्यक्तिमत्व हरपले आहे 

श्री नाना पाटेकर यांच्या निधनाने वेळे. भिलारवाडी ग्रामस्थांमध्ये दुःखाची भावना व्यक्त होत असून त्यांच्या सामाजिक कार्याला आणि वेळे गावासाठी केलेल्या सहकार्याला स्मरण करण्यात येत आहे. वेळेच्या जलसंधारणाच्या कार्यात नानाने दिलेला हातभर. कधीही विसरता येणार नाही पाणीदार वेळेच्या प्रत्येक थेंबात त्यांच्या सहकार्याची आठवण सदैव जिवंत राहील. श्री. नाना पाटेकर यांना ग्रामपंचायतवेळे व समस्त ग्रामस्थांच्या वतीने  भावपूर्ण श्रद्धांजली ईश्वर दिवंगत  आत्म्यास चिरशांती देवो आणि  त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची  शक्ती देवो., ग्रामपंचायत वेळे तालुका वाई जिल्हा सातारा


Post a Comment

0 Comments