दैनिक लोकयुवा दिग्रस तालुका प्रतिनिधी/गजानन गंडाळे
सध्या सर्वत्र नवरात्र उत्सव आणि दुर्गा उत्सव पाहायला मिळत आहे मात्र एका बाजूला आनंदाचे वातावरण असताना दुसरीकडे माकडांच्या वाढत्या उपद्रवामुळे गावकऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना जीव मुठीत धरून उत्सव साजरा करण्याची वेळ तुपटाकळी येथील गावकऱ्यांवर आली आहे.वन विभागाच्या उदासी कारभाराच्या फटका आता थेट सण उत्सवाला बसत आहे.
नवरात्र उत्सवानिमित्त गावात ठिकठिकाणी दुर्गादेवीची मूर्तीची स्थापना करण्यात आली असून आकर्षक मंडप उभारण्यात आले आहे रात्रीची आरत्या महिलांच्या सहभाग गरबा आणि विविध धार्मिक कार्यक्रमामुळे गावात उत्सव असतो मात्र गेल्या काही वर्षापासून गावात माकडांच्या उच्छधामुळे नागरिकांमध्ये तीव्र दहशत पसरली असून लहान मुले महिला वयोवृद्ध नागरिकांवर माकडांच्या टोळ्यांनी हल्ले केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.घरांच्या पत्रावर उड्या मारणे अन्नधान्याची नासाडी करणे आणि थेट नागरिकांच्या अंगावर धावून जाणे यामुळे लोकांची जगणे मुश्किल झाले असून अशा परिस्थितीत दुर्गा उत्सव कसा साजरा करायचा असा गंभीर प्रश्न तुपटाकळी येतील गावकऱ्यासमोर उभा आहे.
या संपूर्ण समस्येबाबत वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या समस्येकडे लवकरात लवकर माकडांचा बंदोबस्त न लावल्यास नागरिकांकडून आंदोलनाचा इशारा देण्यात देण्यात आला

0 Comments