Ticker

6/recent/ticker-posts

माँ कालिका माता संस्थान शारदा देवीचे भक्तिभावात विसर्जन; 75 महिलांचा अनोखा गरबा ठरला आकर्षण



डीजेचा दणदणाट टाळून भक्तीगीतांवर विसर्जन मिरवणूक; पैणगंगा नदी पात्रात विसर्जन


दैनिक लोकयुवा प्रतिनिधी विशाल हलवले 

केळापूर  :- पाटणबोरी येथील सर्वात मोठे महिला मंडळ म्हणून ओळख असलेल्या माँ कालिका माता संस्थान शारदा देवीचे विसर्जन मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात करण्यात आले.

    गावात 75 महिलांचे सदस्य असलेले हे एकमेव महिला मंडळ आहे. नवरात्राच्या नऊ दिवस या मंडळाच्या महिलांनी गरबा, महिला मंडळ भजन, विविध सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे केले.

     या वर्षीच्या विसर्जनाचे विशेष आकर्षण म्हणजे कोणतेही वाद्य न लावता, एकाच वेशभूषेत 75 महिलांनी एका स्पीकरवर देवी मातेच्या गाण्यांवर गरबा खेळत अनोखी विसर्जन मिरवणूक काढली. या शिस्तबद्ध आणि भक्तिमय मिरवणुकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

यावर्षी खुनी नदी पात्रात विसर्जनासाठी पाणी नसल्याने रात्री 10 वाजता पिंपळखुटी येथील पैणगंगा नदी पात्रात देवीचे विसर्जन करण्यात आले.


Post a Comment

0 Comments