Ticker

6/recent/ticker-posts

एकता सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळाचा स्तुत्य उपक्रम; नवरात्रात 9 दिवस 500 ते 600 भाविकांना महाप्रसाद



दैनिक लोकयुवा प्रतिनिधी विशाल हलवले 

*केळापूर  :-* येथील वार्ड क्र. 2, इंदिरा नगरातील फॉरेस्ट ऑफिस परिसरात विराजमान असलेल्या एकता सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने नवरात्र उत्सवादरम्यान 9 दिवस महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

गावात अनेक दुर्गा मंडळेआहेत, मात्र या मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत दररोज रात्री 500 ते 600 लोकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था केली. त्यामुळे येथील अनेक कुटुंबांचा एक वेळच्या जेवणाचा खर्च वाचला. दररोज गोड पदार्थासह नवनवीन पदार्थ बनवून भाविकांना महाप्रसाद देण्यात आला.

यासोबतच मंडळाच्या वतीने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमही राबविण्यात आले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष अमोल कनाके यांचे मोलाचे योगदान लाभले असून सर्व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.


Post a Comment

0 Comments