एक जण जागीच ठार, तर एक गंभीर जखमी कासारीजवळ पुलावर चारचाकी वाहनाचा अपघात; चार वर्षापासून पुलाचे काम अपूर्ण, कंत्राटदारावर कारवाईची ग्रामस्थांची मागण
दैनिक लोक युवा प्रतिनिधी . सागर काळे
आष्टी - अहिल्यानगर रोडवर कासारी जवळ पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एक जण जागीच ठार झाला असून, दुसरा एक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना (रविवार) पहाटे सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास घडल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगातील चारचाकी वाहनांचा ताबा सुटल्याने वाहन सुमारे १५० फूट अंतर फेकले गेले. या अपघातात वाहनाचा चेंदामेंदा झाला आहे. घटनास्थळी एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला,तर दुसरा प्रवासी गंभीर जखमी झाला आहे. स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी व्यकीला उपचारासाठी रुग्णालयात हलविले.
अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी रस्त्यावरील अपूर्ण पुलाचे काम, सुरक्षा उपाययोजना अपूरी असणे आणि अंधारामुळे अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.कासारीजवळील पुलाचे काम मागील चार वर्षापासून अपूर्ण अवस्थेत असून, या ठिकाणी योग्य सूचना फलक, बांधकामाची सुरक्षितता आणि प्रकाशव्यवस्था नसल्याने वारंवारअपघात होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे.
ग्रामस्थांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, पुलाचे काम तातडीने पूर्ण करावे, अपूर्ण कामामुळे होणान्या अपघातांना जबाबदार असलेल्या कंत्राटदारावर कठोर कारवाई करावी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना त्वरित कराव्यात.या अपघाताने परिसरात हळहळ व्यक होत असून, रस्त्यावरील सुरक्षा व्यवस्थेकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी जोर धरत आहे.

0 Comments