Ticker

6/recent/ticker-posts

दुष्काळग्रस्त ग्रामस्थांना रोलर ड्रमचे वाटप; कायरी ग्रामपंचायतीचा पुढाकार



   दैनिक लोक युवा   पालघर जिल्हा प्रतिनिधी फैजान खान

जव्हार: जव्हार तालुका हा दुष्काळग्रस्त व दुर्गम भाग म्हणून ओळखला जात असून, अनेक गाव-पाड्यांतील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. विशेषतः महिलांना दूरवरून डोक्यावरून किंवा हाताने पाणी वाहून आणावे लागते. ही समस्या लक्षात घेऊन कायरी ग्रामपंचायतीच्या वतीने हट्टी पाडा येथील ४७ गरजू कुटुंबांना पाणी वाहण्यासाठी रोलर ड्रमचे मोफत वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.

      कायरी ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या हट्टी पाडा येथील नागरिकांना दूर अंतरावरून डोक्यावर पाणी वाहून आणताना होणारा त्रास कमी व्हावा, तसेच पाण्याचा साठा सुरक्षितपणे करता यावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. रोलर ड्रममुळे पाणी वाहून नेणे अधिक सोयीचे झाले आहे, विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचे श्रम कमी होण्यास मदत होत आहे. पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या दुर्गम भागातील कुटुंबांसाठी हा उपक्रम लाभदायक ठरत आहे.

     या वाटपप्रसंगी कायरी ग्रामपंचायतीचे सरपंच मिनता पोटिंदा, दाभलोण चे सरपंच सुदाम उंबरसाडा, उपसरपंच अभिमन्यू भोये , ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक तसेच हट्टीपाडा येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाणीटंचाईच्या काळात पाणी वाहून नेण्यासाठी उपयुक्त साधन उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीचे आभार मानले. दुष्काळग्रस्त या भागात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी अशा लोकाभिमुख उपक्रमांची आवश्यकता असून, यामुळे ग्रामीण भागातील महिलांचे श्रम कमी होण्यासह दैनंदिन जीवन सुसह्य होण्यास मदत होणार आहे.

Post a Comment

0 Comments