आदिवासी समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्नांवर चर्चा
धडगाव प्रतिनिधी : अर्जुन पावरा
शहादा (जि. नंदुरबार) : अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकीभाऊ जाधव (नाशिक) यांनी नंदुरबार जिल्हा दौऱ्यादरम्यान जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) यांची भेट घेतली. यावेळी आदिवासी समाजाच्या विविध समस्या, दुर्गम भागांतील मूलभूत सुविधा, शिक्षण आणि आरोग्यविषयक प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
जिल्हा दौऱ्याच्या समारोपानिमित्त जाधव यांनी शहादा येथे भेट दिली. शहरातील क्रांतिवीर बिरसा मुंडा चौकात सायंकाळी ७ वाजता क्रांतिवीर बिरसा मुंडा स्मारक बहुउद्देशीय संस्था, शहादा यांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. संस्थेच्या वतीने त्यांना धरती आबा क्रांतिवीर बिरसा मुंडा यांची प्रतिमा भेट देऊन सन्मानित करण्यात आले.
लकीभाऊ जाधव हे आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती, वसतिगृह सुविधा, शिक्षण तसेच समाजाच्या हक्क आणि अधिकारांच्या संरक्षणासाठी कार्यरत आहेत. त्यांच्या सामाजिक कार्याचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. स्वागत व सत्कारानंतर परिसरातील आदिवासी बांधवांच्या सामाजिक आणि शैक्षणिक समस्यांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी उपस्थित मान्यवर सुनिल सुळे (संस्थापक अध्यक्ष, क्रांतिवीर बिरसा मुंडा स्मारक बहुउद्देशीय संस्था, शहादा), निलेश सुळे (सरपंच, लगडी भवानी), आजाद ठाकरे (सरपंच, टेमली), संजय पाडवी (सरपंच, चांदसैली), जवखेडे येथील सरपंच, नरेंद्र भंडारी (उपसरपंच, शहाणा), मनोहर पावरा (सचिव, क्रांतिवीर बिरसा मुंडा स्मारक बहुउद्देशीय संस्था, शहादा), करणसिंग तडवी सर (संचालक), दिगंबर चव्हाण (सहाय्यक कृषी अधिकारी), गजूभाऊ मोरे (सामाजिक कार्यकर्ते), ॲड. पावरा, पद्माकर सुळे, प्रेम भोसले आणि देवराज चव्हाण आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाला परिसरातील आदिवासी समाजबांधव, विविध विभागांतील शासकीय व निमशासकीय कर्मचारी तसेच तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 Comments