Ticker

6/recent/ticker-posts

अक्कलकुवा-अक्राणीच्या पाणीप्रश्नावर महत्त्वाची बैठक; १,५६२ कोटींच्या योजनांना मंजुरी



धडगाव प्रतिनिधी : अर्जुन पावरा

नंदुरबार : अक्कलकुवा-अक्राणी तालुक्यातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आज, दि. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या दालनात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीला आमदार आमश्या दादा पाडवी, राज्याचे पाणीपुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव तसेच नंदुरबार जिल्ह्यातील पाणीपुरवठा विभाग आणि जल जीवन मिशनचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जळगाव उपविभाग-नंदुरबार तसेच जल जीवन मिशन अंतर्गत विविध पाणीपुरवठा योजनांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती देण्यात आली. नर्मदा नदी बारमाही जलस्रोत योजनेसाठी ८४४.९५ कोटी रुपये, तर हंगामी नदी व हंगामी साठवण धोरणासाठी ७१७.७४ कोटी रुपये, अशा एकूण १,५६२.६९ कोटी रुपयांच्या योजनांना मंजुरी देण्यात आली आहे.

या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करून अक्कलकुवा-अक्राणी मतदारसंघातील गावांना नियमित पाणीपुरवठा करण्यावर बैठकीत भर देण्यात आला. तसेच वस्ती समावेशन धोरणाच्या माध्यमातून सर्व वस्त्यांना १०० टक्के पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.

या योजनांची अंमलबजावणी पूर्ण झाल्यानंतर अक्कलकुवा-अक्राणी मतदारसंघातील पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यास मोठी मदत होणार असल्याचे सांगण्यात आले

Post a Comment

0 Comments