Ticker

6/recent/ticker-posts

चिखली (मैना) येथे जागतिक कापूस दिन उत्साहात साजरा....!


 

अ‍ॅग्रिजेनिक एफपीसी व विजय कॉटन अँड फायबर कंपनी LLPचा संयुक्त उपक्रम; शाश्वत कापूस शेतीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन)

 काटोल प्रतिनिधी :- विकास सोमकुवर 

“कापूस हा शेतकऱ्यांच्या समृद्धीचा तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार आहे. कापूस उत्पादनात शाश्वत व पुनरुत्पादक शेती पद्धतींचा अवलंब करून उत्पादन खर्च कमी करण्याबरोबरच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन कार्यक्रमातील मार्गदर्शकांनी केले.

जागतिक कापूस दिनानिमित्त अ‍ॅग्रिजेनिक फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या वतीने रिजेनेरेटिव्ह कॉटन स्टँडर्ड्स (RCS) प्रकल्पांतर्गत मौजा चिखली (मैना), ता. काटोल येथे कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष जनजागृती व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विजय कॉटन अँड फायबर कंपनी LLP व एन बाय ट्रेड फाऊंडेशन यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम घेण्यात आला.

कार्यक्रमात कापूस पिकातील शाश्वत व पुनरुत्पादक शेती पद्धती, मातीचे आरोग्य संवर्धन, पाण्याचे योग्य व्यवस्थापन, एकात्मिक कीड व्यवस्थापन, हवामान बदलास अनुकूल शेती पद्धती, उत्पादन खर्च कमी करणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी गुणवत्तापूर्ण कापूस उत्पादन, शेतकऱ्यांचे हक्क, योग्य बाजारपेठेची निवड तसेच कापसाच्या मूल्यसाखळीत शेतकऱ्यांची महत्त्वाची भूमिका याबाबतही जनजागृती करण्यात आली. बदलत्या हवामान परिस्थितीत कापूस उत्पादकांनी आधुनिक तंत्रज्ञानासोबतच नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करण्यावर भर देण्याचे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमास अ‍ॅग्रिजेनिक फार्मर प्रोड्यूसर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आकाश धुंदे, मंडळ कृषी अधिकारी अरुण चरपे, मंडळ कृषी अधिकारी बांबल सर, समूह सहाय्यक रितिक  काळे (पोखरा ),पाणी फाउंडेशनचे सचिन लांडे, AEG फाउंडेशनचे मनोज धर्माळे, उमेद अभियानाच्या कादंबरी आगलावे, कृषी तज्ज्ञ कृष्णाजी डफरे, पोलीस पाटील भुजंग गोंडाणे, गणपत दुपारे, प्रकल्प व्यवस्थापक डॉ. बुद्धभूषण वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

तसेच प्रकल्प अधिकारी धनंजय चाटरकर, क्षेत्र समन्वयक विकासजी सोमकुवर, निखिल दुपारे, विनायक जी बागडे, सोपीनाथजी सोमकुवर, भीमराव दुपारे, सुरेश दुपारे, ज्ञानेश्वर दुपारे, प्रेमदास दुपारे,गौतम पाटील,महिला शेतकरी प्रमिलाबाई पाटील, ताई बाई सोमकुवर, बेबीबाई दुपारे, प्रतिभा दुपारे, विमल गौरखेडे, कौतिका बाई परीपगारे, सुशीला दुपारे  यांच्यासह मोठ्या संख्येने कापूस उत्पादक शेतकरी, महिला शेतकरी, ग्रामस्थ तसेच कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या माध्यमातून कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आधुनिक, शाश्वत व पुनरुत्पादक शेतीकडे वाटचाल करण्यासाठी आवश्यक माहिती मिळाली. शेतकऱ्यांनीही विविध विषयांवर मार्गदर्शकांशी संवाद साधून आपल्या अडचणी व अनुभव मांडले.

Post a Comment

0 Comments