Ticker

6/recent/ticker-posts

मा.श्री. जयवंत डिसले यांची महाराष्ट्र शासनाच्या सहकारी संस्थांचे लेखापरीक्षक म्हणून पुन्हा एकदा नेमणूक!



दैनिक लोक युवा सातारा/पाटण:

महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागामार्फत राज्यातील सहकारी संस्थांच्या सन २०२६ ते २०२८ या वर्षाकरिताची अधिकृत लेखा परीक्षण नामतालिका (Panel of Auditors) दिनांक १३ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीमध्ये सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील माईंगडेवाडी येथील रहिवासी श्री. जयवंत डिसले यांची लेखा परीक्षक (Auditor) म्हणून पुन्हा एकदा सन्मानपूर्वक निवड करण्यात आली असल्यामुळे माइंगडेवाडीच्या गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा....

श्री. जयवंत डिसले यांना सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात विशेष आवड आहे. मुंबईत वास्तव्यास असल्या मुळे त्यांनी 'मुंबईमध्ये कराड-पाटण तालुका युवा मित्र मंडळ' स्थापना करून मुंबईत राहणाऱ्या कराड आणि पाटण तालुक्यातील रहिवाशांना हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले आहे. तरुण मुलांसाठी क्रिकेट व कबड्डी या खेळाचे आयोजन करण्यात येते.त्यांच्या या सामाजिक कार्यामुळे आणि जनसंपर्कामुळे अनेक गरजू नागरिकांना न्याय व हक्क मिळण्यास मदत झाली आहे.

त्यांच्या या निवडीबद्दल समाजकारणातील ज्येष्ठ मार्गदर्शक, तरुण कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून त्यांचे जाहीर अभिनंदन करण्यात येत असून, पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Post a Comment

0 Comments