दैनिक लोकयुवा प्रतिनिधी पवन शिरभातेआर्वी
टाइम्स ऑफ इंडिया, नागपूर आणि महाराष्ट्र टाइम्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘आयकॉन ऑफ हेल्थकेअर 2026’ या मानाच्या पुरस्काराने वर्धा येथील सुप्रसिद्ध तज्ज्ञ डॉक्टर दाम्पत्य डॉ. सौरभ देशमुख आणि डॉ. तृप्ती देशमुख (ठाकरे) यांचा गौरव करण्यात आला.केंद्रीय मंत्री मा. श्री. नितीनजी गडकरी यांच्या हस्ते नागपूर येथील हॉटेल सेंटर पॉईंट येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.आयुर्वेदाच्या माध्यमातून जटिल व दीर्घकालीन आजारांवर उपचार करण्यासाठी दिलेले उल्लेखनीय योगदान तसेच रुग्णसेवेतील समर्पणाची दखल घेत या डॉक्टर दाम्पत्याला हा सन्मान प्रदान करण्यात आला.
डॉ. सौरभ देशमुख, हे गेल्या १४ वर्षांपासून महात्मा गांधी आयुर्वेद रुग्णालय व दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद, सालोड येथे कार्यरत असून आयुर्वेदाच्या माध्यमातून विविध जटिल व दीर्घकालीन आजारांवर उपचार करत आहेत. सोरायसिस, पक्षाघात, कोलायटिस, विविध पचनसंस्थेचे विकार, Avascular Necrosis (AVN), पुरुष वंध्यत्व, टाळू व केसांचे विकार, त्वचारोग, पित्ताशयातील खडे, किडनी स्टोन तसेच लंबर डिस्कसंबंधित समस्यांवर त्यांनी उपचार केले आहेत. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, अलीकडेच Huntington’s disease (Huntington’s chorea) सारख्या अत्यंत गुंतागुंतीच्या व उपचारासाठी आव्हानात्मक आजाराच्या रुग्णावर आयुर्वेदिक औषधोपचाराच्या माध्यमातून उपचार केले आहेत.रुग्णांच्या सोयीसाठी डॉ. सौरभ देशमुख हे दर रविवारी नागपूर, सीताबर्डी येथे ओपीडीमध्ये तसेच,वर्धा येथील राधा मेडिकलजवळ ‘स्पर्श आयुर्वेद क्लिनिक’मध्ये दररोज संध्याकाळी रुग्णसेवा देतात.
डॉ. तृप्ती देशमुख (ठाकरे)या गेल्या ७ वर्षांपासून दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद, सालोड येथे कार्यरत असून बालरोग क्षेत्रात आयुर्वेदिक उपचार व रुग्णसेवा देत आहेत.आयकॉन ऑफ हेल्थकेअर 2026’ हा सन्मान त्यांच्या आयुर्वेद व आरोग्यसेवेतील कार्याची पावती मानला जात असून, या पुरस्कारामुळे त्यांना भविष्यातही अधिक समर्पणाने रुग्णसेवा करण्याची प्रेरणा मिळणार आहे. त्यांच्या या गौरवास्पद यशाबद्दल,
वैद्यकीय क्षेत्रातून, सहकाऱ्यांकडून तसेच कुटुंबीयांकडून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून, पुढील वाटचालीसाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहेत. डॉक्टर दांपत्य यांना आर्वीचे लोकप्रिय समाजसेवक श्री सुशील सिंह ठाकुर जी यांनी त्यांच्या कार्याला व भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

0 Comments