Ticker

6/recent/ticker-posts

राक्षसभुवन येथे सौरपंपाची केबल चोरी; शेतकऱ्यांचे संकट वाढले



 प्रतिनिधी बोरगाव जय गांगुर्डे

 राक्षसभुवन येथे सौरपंपाची ५०० फूट केबल चोरी; नदीपात्रात सोललेली साल आढळली दुष्काळसदृश परिस्थितीत शेतकऱ्यांपुढे नवे संकट; चोरट्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू राक्षसभुवन परिसरातील शेतकऱ्यांसाठी पाणी उपसा करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सौरपंपाची तब्बल ५०० फूट लांबीची केबल चोरीला गेल्याची घटना राक्षसभुवन येथे घडली आहे. चोरीनंतर केबल सोलून त्यातील साल नदीमध्ये टाकण्यात आल्याचे आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सध्या पावसाने ओढ दिल्याने भातशेती करपण्याच्या मार्गावर आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी सौरपंप हा पाणीपुरवठ्याचा महत्त्वाचा आधार ठरत असताना त्याची केबलच चोरीला गेल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. सदर घटनेनंतर संबंधित शेतकऱ्यांकडून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. चोरीबाबत माहिती असलेल्या व्यक्तींनी पुढे येऊन माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्या व्यक्तीस योग्य ते बक्षीस देण्यात येईल, असेही सांगण्यात आले आहे.

शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. चोरीबाबत माहिती असलेल्या व्यक्तींनी पुढे येऊन माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्या व्यक्तीस योग्य ते बक्षीस देण्यात येईल, असेही सांगण्यात आले आहे. दरम्यान, अशा प्रकारच्या चोरीच्या घटनांमुळे शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातून होत आहे..

Post a Comment

0 Comments