झारगडवाडी : राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न, माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायत झारगडवाडी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. ग्रामपंचायत प्रशासक तथा विस्तार अधिकारी श्री. भिमराव भागवत यांच्या हस्ते महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी ग्रामपंचायत झारगडवाडीचे ग्रामविकास अधिकारी श्री. विशाल घुले, माजी सरपंच श्री. अजित बोरकर, माजी सरपंच श्री. पद्मनाभ निकम, मेखळी-सोनगाव-झारगडवाडी-डोर्लेवाडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे अध्यक्ष श्री. हनुमंत झारगड, श्री. सुनील महाडिक, श्री. काका झारगड तसेच ग्रामपंचायत कर्मचारी श्री. अनिल माने, श्री. आदित्य आवटे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस अभिवादन करून त्यांच्या कार्याला उजाळा दिला. सत्य, अहिंसा, स्वच्छता आणि देशसेवेचा संदेश देणाऱ्या महात्मा गांधींच्या विचारांचे तसेच साधेपणा, प्रामाणिकपणा आणि राष्ट्रनिष्ठेचे प्रतीक असलेल्या लालबहादूर शास्त्री यांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले.कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

0 Comments