प्रतिनिधी बोरगाव जय गांगुर्डे,
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त बोरगाव येथील ग्रुप ग्रामपंचायत कार्यालयात अभिवादन व स्मरण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी विनम्र अभिवादन केले. तसेच त्यांच्या कार्याचा व विचारांचा जागर करत समाजजीवनात सत्य, अहिंसा, स्वच्छता आणि ग्रामस्वराज्याच्या मूल्यांचा अंगीकार करण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी गांधीजींच्या जीवनकार्याचा आढावा घेत देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या योगदानाचे स्मरण केले. ग्रामविकास, सामाजिक समता, स्वावलंबन आणि स्वच्छतेबाबत गांधीजींनी दिलेले विचार आजही तितकेच प्रेरणादायी व मार्गदर्शक असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात गावाच्या विकासासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज अधोरेखित करण्यात आली. तसेच स्वच्छ व सुंदर गाव निर्मितीसाठी प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले.
याप्रसंगी सरपंच अशोक गवळी, विजय भोये, सखाराम भोये, संतोष चव्हाण, कैलास गायकवाड, वसंत कुवर, ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब सुखदेव बागुल, ग्रामपंचायत सदस्य जय गांगुर्डे, रमेश पवार, वामन गवळी, अशोक आहेर, विठ्ठल बागुल, कृष्णा गायकवाड, यशवंत गायकवाड, कमलेश पवार तसेच ग्रामपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी महात्मा गांधी यांच्या विचारांचा प्रसार करण्यासह गावाच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला. कार्यक्रम शांततापूर्ण व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला

0 Comments