पंतप्रधानांकडे पाठपुरावा करणार असल्याचे राणा दाम्पत्यांचे आश्वासन.!
प्रतिनिधी पवन शिरभाते आर्वी
तिवसा जिल्हा अमरावती येथून माहिती प्राप्त.भारतीय संस्कृतीचे थोर विचारवंत, ग्रामगीता या अमर ग्रंथाचे निर्माते, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना मरणोत्तर "भारतरत्न" हा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात यावा, या मागणीसाठी गुरुदेव भक्तांच्या शिष्टमंडळाने आज माजी खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांची भेट घेऊन निवेदन दिले.
यावेळी शिष्टमंडळाच्या वतीने राष्ट्रसंतांचे कार्य, ग्रामोद्धारासाठी दिलेले योगदान आणि स्वातंत्र्य आंदोलनातील त्यांची भूमिका याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. राष्ट्रसंतांचे विचार आजही लाखो युवकांना प्रेरणा देत असून त्यांना भारतरत्न देणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.या भेटी दरम्यान राणा दाम्पत्याने या मागणीला पूर्ण पाठिंबा दर्शविला असून, लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन या मागणीचा पाठपुरावा करणार असल्याचे ठोस आश्वासन राणा दाम्पत्यांकडून शिष्टमंडळाला देण्यात आले.
यावेळी शिष्टमंडळाने राणा दाम्पत्याला राष्ट्रसंतांचा अमर ठेवा असेल ग्रामगीता ग्रंथ भेट दिली.यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज"भारतरत्न"कृती समितीचे संयोजक तथा सामाजिक कार्यकर्ते मुकूंद पूनसे,रामकृष्ण हरी विश्वमानव मंदिर दास टेकडीचे अध्यक्ष ह.भ.प.विलास महाराज साबळे,सामाजिक कार्यकर्ते रविराज देशमुख,आजीवन प्रचारक तथा संघटक प्रल्हाद पारिसे गुरुजी,सामाजिक कार्यकर्ते जयकुमार बोके,सामाजिक कार्यकर्ते धीरज केने,बबलू उर्फ प्रवीण खैरकार,सेवानिवृत अधीक्षक अभियंता रमेश ढवळे,सेवानिवृत्त उपविभागीय अधिकारी विनोद शिरभाते,ग्रामगीताचार्य प्रा.नरेंद्र राऊत,भजनरत्न नितीन कुबडे,भजन प्रमुख पुरुषोत्तम खोडे,कृती समितीचे सचिव नगरसेवक अमर वानखडे,गुरुदेव सेवक अशोकराव माहोरे,अभिजित निमकर,सौरभ कोहळे,हैबतराव गाडगे,उद्धवराव पैठणकर,अमोल बोके,गुरुदेवभक्त राजेंद्र बीजागिरे,गुरुदेव प्रचारक नरेश भोयर,संजय ठाकरे,संदीप थोटे,यांच्यासह असंख्य गुरुदेव उपस्थित होते,

0 Comments