("कापूस – शेतकऱ्यांच्या समृद्धीचा आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचा आधार")
काटोल प्रतिनिधी :-विकास सोमकुवर
खराळा, नरखेड (दि. ०७ ऑक्टोबर २०२६) -* जागतिक कापूस दिनानिमित्त अॅग्रिजेनिक शेतकरी उत्पादक कंपनीच्या वतीने रेजेनेरेटिव्ह कॉटन स्टँडर्ड्स (RCS) प्रकल्प अंतर्गत मौजे खराळा, ता. नरखेड येथे कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष जनजागृती व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमामध्ये कापूस पिकातील शाश्वत व पुनरुत्पादक शेती पद्धती, मातीचे आरोग्य संवर्धन, पाण्याचे योग्य व्यवस्थापन, एकात्मिक कीड व्यवस्थापन, हवामान बदलास अनुकूल शेती, उत्पादन खर्च कमी करणे व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.तसेच गुणवत्तापूर्ण कापूस उत्पादन, शेतकऱ्यांचे हक्क, योग्य बाजारपेठ व कापूस मूल्यसाखळीमध्ये शेतकऱ्यांची महत्त्वाची भूमिका याबाबत जनजागृती करण्यात आली.
या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून अॅग्रिजेनिक शेतकरी उत्पादक कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आकाश धुंदे, खराळा गावचे सरपंच श्री. राहुलजी कामडी, माजी जि.प. सभापती श्री. प्रवीणजी जोध, भारसिंगी मंडळ कृषी अधिकारी श्री. गजानन धवले, कृषी पर्यवेक्षक श्री. बालपांडे, प्रकल्प व्यवस्थापक डॉ. बुद्धभूषण वानखेडे उपस्थित होते.तसेच प्रकल्प अधिकारी श्री. विनोद निंबाळकर, श्री. अमोल जिवतोड, क्षेत्र समन्वयक श्री. शुभम वानखडे, श्री. पंकज निंबाळकर, श्री. गौरव फंदी यांच्यासह मोठ्या संख्येने कापूस उत्पादक शेतकरी बांधव, महिला शेतकरी, ग्रामस्थ व कृषी विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन विजय कॉटन अँड फायबर कंपनी LLP व एड बाय ट्रेड फाऊंडेशनच्या सहकार्याने करण्यात आले होते

0 Comments