Ticker

6/recent/ticker-posts

वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी महामंडळाची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी



प्रतिनिधी पवन शिरभाते  आर्वी 

आर्वी- महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना गेल्या सोळा वर्षापासून सतत न्याय व कल्याणकारी महामंडळासाठी सातत्याने संघर्ष करीत आहे. या विषयाकडे गांभीर्यपूर्वक लक्ष वेधण्यासाठी 9 ऑक्टोबर रोजी संपूर्ण राज्यभरात लोकशाही व शांततेच्या मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालय व तालुक्याच्या ठिकाणी निवेदन सादर करण्यात आले .

वर्धा जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने आर्वी तालुका वृत्तपत्र विक्रेता संघटना तर्फे मा. शिरसाठ साहेब, उपविभागीय अधिकारी, आर्वी यांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी निवेदन देताना जिल्हाध्यक्ष सुनील पारसे, सदस्य प्रवीण सरोदे ,राजेश सोळंकी ,जिल्ह्यातील एकमेव महिला वृत्तपत्र विक्रेता शुभांगी पारसे, आनंद गोटे, स्वप्निल गुल्हाने ,सचिन गायकवाड ,ज्ञानेश्वर मेंद्रे, बाळाभाऊ कुलकर्णी, सचिन गायधने, सुभाष मांडेकर, रवींद्र दारूंडे यांचे सह तालुक्यातील वृत्तपत्र विक्रेता व पत्रकार मंडळी उपस्थित होती .

कित्येक वर्षाच्या लढ्यानंतर 10 ऑक्टोंबर 2024 रोजी मंत्रिमंडळाने या महामंडळाचा निर्णय सुद्धा घेण्यात आला. तेव्हापासून आज अद्याप पर्यंत मंत्रिमंडळाची मंजुरी मिळून ही महामंडळाची प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली नाही. सरकारचे या विषयाकडे गांभीर्यपूर्वक लक्ष वेधण्यासाठी 9 ऑक्टोबर रोजी आर्वी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. उन्हाळा- पावसाळ्यात थंडी -वाऱ्यात जनतेपर्यंत वृत्तपत्र पोहोचवणारे छपाई माध्यमातील या सर्वात महत्त्वाच्या कष्टकरी, असंघटित घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी महामंडळाची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी, अशी मागणी यांनी निवेदनातून करण्यात आली.

Post a Comment

0 Comments