दैनिक लोक युवा प्रतिनिधी बोरगाव जय गांगुर्डे
कळवण प्राथमिक आरोग्य केंद्र नवी बेज येथील ॲम्बुलन्स गाडी क्रमांक mh १५ JW ४११२ मोटरसायकल गाडी नंबर MH ४१ R १६०५ यांच्यात अपघात झाला असून ॲम्बुलन्स कळवण च्या दिशेने येत असताना शिवफाटा चौफुली येथे मोटरसायकल भरधाव वेगाने ॲम्बुलन्सला धडक दिली असता ॲम्बुलन्स थेट झाडावर कोसळली आहे. सुदैवाने ॲम्बुलन्स मध्ये पेशंट नव्हते ॲम्बुलन्स ही कळवण येथील उपजिल्हा रुग्णालयात वॅक्सिंग सोडायला जात असताना हा अपघात घडला आहे.
ॲम्बुलन्स ड्रायव्हर व मोटरसायकल चालक दोघे ही उपचार साठी उपजिल्हा रुग्णालय कळवण येथे दाखल करण्यात आले असून दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे.
तसेच शिव फाटा बाबाजी पगार यांच्या शेता जवळ चौफुली असून तेथे कोणत्याही रस्त्याला स्पीड ब्रेकर नाहीत कळवण बेज हा दोन पदरी डांबर रस्ता झाला आहे तरी ह्या चौफुली ठिकाणी बांधकाम विभागाने तात्काळ स्पीड ब्रेकर टाकावे अशी नागरिकांन कडून मागणी होत आहे.

0 Comments