दैनिक लोक युवा नागपूर,
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान पार पडले. नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या सहा जिल्ह्यांतील मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला. उपलब्ध वृत्तानुसार दुपारी १२ वाजेपर्यंत २३.९३ टक्के मतदान झाले होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह विविध राजकीय नेत्यांनी मतदानाचा हक्क बजावला.
या निवडणुकीच्या निकालाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. निकालाची अधिकृत घोषणा होईपर्यंत विजयी उमेदवाराबाबत निष्कर्ष काढता येणार नाही.

0 Comments