Ticker

6/recent/ticker-posts

सावर्‍या-भमाणा रस्त्यावर वन विभागाची कारवाई; सागाच्या ११४ चौकटींसह बोलेरो पिकअप जप्त


धडगाव : प्रतिनिधी अर्जुन पावरा

धडगाव तालुक्यातील सावर्‍या-भमाणा रस्त्यावर गस्त घालत असताना वन विभागाच्या पथकाने बोलेरो पिकअप वाहनातून सागाच्या चौकटींची अवैध वाहतूक पकडली. या कारवाईत सागाच्या ११४ नग चौकटी, एकूण १३.६४५ घनमीटर लाकूड जप्त करण्यात आले.

जप्त साग मालाची किंमत ₹३७,६९४, तर बोलेरो पिकअप वाहनाची अंदाजे किंमत ₹२ लाख ७५ हजार असून, जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ₹३ लाख १२ हजार ६९४ इतकी आहे.

जप्त करण्यात आलेला मुद्देमाल पावतीद्वारे वनरक्षक, धडगाव यांच्या ताब्यात देण्यात आला. तसेच वनरक्षक सावर्‍या यांनी वनगुन्हा नोंदविला असून, पुढील तपास वनपाल भरतसिंग परदेशी करीत आहेत.

ही कारवाई वनसंरक्षक श्रीमती निनु सोमराज, धुळे वनवृत्त; उपवनसंरक्षक संतोष सस्ते, नंदुरबार; विभागीय दक्षता अधिकारी राजेंद्र सदगिर, धुळे वनवृत्त; तसेच सहाय्यक वनसंरक्षक रोशन बुवा (रोजगार हमी योजना), अक्राणी वनविभाग, नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईत वनक्षेत्रपाल लक्ष्मीकांत शेंडगे, बिलगाव यांच्यासह वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.


Post a Comment

0 Comments