“प्रतिनिधी – प्रतीक वधाई,
नागपूर जिल्हा”नागपूर | २ सप्टेंबर २०२६कोराडी येथील ६६० मेगावॅट औष्णिक वीज केंद्रातील युनिट क्रमांक १० मध्ये वार्षिक देखभाल-दुरुस्तीचे काम सुरू असताना मंगळवारी रात्री गंभीर अपघात झाला. बॉयलर विभागात कॉइल काढण्याचे काम सुरू असताना लोखंडी रॅक अंगावर पडल्याने कंत्राटी कामगार मारुती मेश्राम (६१) गंभीर जखमी झाले.
उपचारासाठी त्यांना नागपूरला नेत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर रुग्णवाहिका पोहोचण्यास कथित विलंब झाल्याने त्यांना खासगी वाहनातून रुग्णालयात नेण्यात आल्याचे वृत्त आहे.
या घटनेनंतर कोराडी वीज केंद्रातील कंत्राटी कामगारांच्या सुरक्षिततेच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कोराडी पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

0 Comments