Ticker

6/recent/ticker-posts

श्री विघ्नहर्ता युवक गणेश मंडळाचे अध्यक्षपदी सुशील लोखंडे उपाध्यक्षपदी चैतन लोखंडे सचिवपदी गणेश लोखंडे यांची जाहीर निवड

  



धारूर| प्रतिनिधी 

साठे नगर येथील श्री विघ्नहर्ता युवक गणेश मंडळाच्या आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंडळाच्या नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यावेळी अध्यक्षपदी सुशील लोखंडे, उपाध्यक्षपदी चेतन लोखंडे, तर सचिवपदी गणेश लोखंडे यांची निवड करण्यात आली.

तसेच खजिनदारपदी आदित्य लोखंडे, व्यवस्थापकपदी राहुल लोखंडे, मिरवणूक प्रमुखपदी रोहित लोखंडे मार्गदर्शकपदी प्रा.राम लोखंडे यांची निवड करण्यात आली.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणेशोत्सवाच्या माध्यमातून धार्मिक उपक्रमांसोबतच सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा मानस नवनिर्वाचित कार्यकारिणीने व्यक्त केला आहे. गणेशोत्सव शांतता व शिस्तीच्या वातावरणात साजरा करण्यासाठी मंडळाच्या वतीने विशेष नियोजन करण्यात येणार आहे.

नवनिर्वाचित पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांच्या नेतृत्वाखाली यंदाचा गणेशोत्सव अधिक उत्साहात आणि विधायक पद्धतीने साजरा करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. गणेशोत्सवाच्या काळात विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याबाबतही चर्चा करण्यात आली.

मंडळाच्या नूतन कार्यकारिणीच्या निवडीबद्दल साठे नगर परिसरातील नागरिक, युवक आणि गणेशभक्तांकडून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. आगामी गणेशोत्सव यशस्वी करण्यासाठी मंडळातील सर्व सदस्यांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

समीर लोखंडे, पृथ्वीराज लोखंडे, आदित्य लोखंडे, आर्यन लोखंडे, सुमित वैरागे,राजवीर लोखंडे, कृष्णा कांबळे, विजय कांबळे, विजय वाघमारे,अजय वाघमारे,निखिल वाघमारे,व सर्व गणेश मंडळातील तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.


Post a Comment

0 Comments