बारामती, प्रतिनिधी :
बारामती नगरपरिषद, मालमत्ता कर विभागातील वरिष्ठ लिपिक श्री. राजेंद्र सखाराम इंगुले यांच्या प्रदीर्घ, प्रामाणिक व कर्तव्यनिष्ठ सेवेला सलाम करत त्यांच्या सेवापूर्ती निमित्त भावपूर्ण सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी बारामती नगरपरिषदेचे माजी कर्मचारी व विद्यमान नगरसेवक श्री. राजेंद्र सोनवणे, उपमुख्य अधिकारी, कार्यालयीन अधीक्षक, नगररचनाकार, तसेच नगरपरिषदेतील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते श्री. राजेंद्र इंगुले यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन त्यांच्या उत्कृष्ट सेवाकार्याचा गौरव करण्यात आला. उपस्थितांनी त्यांच्या शांत, संयमी, प्रामाणिक व जनाभिमुख कार्यपद्धतीचा गौरव करत त्यांच्या भावी आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, सुख, समाधान आणि दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून श्री. इंगुले यांनी नगरपरिषदेच्या मालमत्ता कर विभागात अनेक वर्षे अत्यंत जबाबदारीने काम करत प्रशासनाच्या कार्यक्षमतेत मोलाचे योगदान दिल्याचे नमूद केले. त्यांच्या कार्यतत्परतेची व सहकार्यशील स्वभावाची आठवण उपस्थितांनी कृतज्ञतेने व्यक्त केली.
समारंभात अधिकारी, कर्मचारी व सहकाऱ्यांनी श्री. इंगुले यांच्याबद्दलच्या आठवणींना उजाळा देत त्यांना भावपूर्ण निरोप दिला. कार्यक्रम आनंददायी आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला.

0 Comments