{नांदेड जिल्हा प्रतिनिधी-शेख अनिस}
नांदेड| तामसा येथे एका व्यक्तीचे खासगी फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत एक लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी तामसा पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,तक्रारदार बाळूसाहेब क्षीरसागर (वय 38,रा.तामसा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंदविण्यात आला.29 जून 2026 रोजी रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास आरोपी संजय उर्फ पंढरी दिगंबर पवार व दत्तभाऊ बाबूराव पवार यांनी संगनमत करून तक्रारदाराशी दूरध्वनीवर संपर्क साधला.
आरोपींनी,"तुझे खासगी फोटो आणि व्हिडिओ आमच्याकडे आहेत.ते डिलीट करायचे असतील तर एक लाख रुपये दे,अन्यथा ते सर्वत्र व्हायरल करू,"अशी धमकी देत खंडणीची मागणी केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास तामसा पोलिस करत आहेत...सदरील आरोपी हा ह्या पूर्वी पण असेच गुन्हा मध्ये समावेश होता ह्या पूर्वी पण अवैध सावकारी खंडणी तसेच जीवे मारण्याची धमकी चे गुन्हे दाखल असून 5 वर्षा पूर्वी पण एका व्यक्तीस 5 हजार रुपया साठी ह्या आरोपीनी एका व्यक्तीस कोळगाव पाथर्ड शिवरात शेतांत नेऊन कपडे काढून झाडाला बांधून मारहान करून व्हिडीओ शुटिंग केली होती ह्या आरोपीना राजकीय पाठबळ असल्याची दाबक्य आवाजात चर्चा असून मा. पोलीस अधीक्षक साहेबनी यांच्या वर कठोर कार्यवाही करावी...

0 Comments